नियोजित तालेरा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची पुनर्बांधणी.

सी.स. न.९६५ व १३९६ ,आरक्षण क्र.२२६,’ब’ प्रभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कामाचे स्वरूप

चिंचवड येथील सि.स.न.९६५ व १३९६ ,आरक्षण क्र.२२६,’ब’ प्रभागातील जुन्या तालेरा रुग्णालयाची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचे मनपा तर्फे नियोजन आहे. मनपा व स्थानिक परिसरामधील नागरिकांसाठी कमी दरात व चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यास सहाय्य्य होणार आहे. येथे १३९ खाटांचे सुसज्ज व मल्टि स्पेसिलीटी रुग्णालय बांधण्याचे नियोजन केले आहे त्यासाठी रक्कम रु. ३९.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर दवाखान्यामध्ये तातडीची सेवा, बाह्यरुग्ण विभाग, क्ष किरण तपासणी विभाग, अतिदक्षता विभाग, मेडिकल व सर्जिकल वॉर्ड ,कान, नाक, घसा व नेत्र विभाग, अस्थिरोग विभाग, चार ऑपरेशन थिएटर, चार लिफ्ट, दोन जिने यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पामुळे मनपाच्या, वाय.सी.एम.एच. व इतर रुग्णालयावरचा ताण कमी होणार आहे. सदर प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण असून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा व शहराच्या लौकिकात भर घालणारा आहे.

गोषवारा – अंदाजपत्रकीय खर्च
अ.क्र. घटक रक्कम .रु. मध्ये
१) स्थापत्य विषयक कामे + प्लंबिंग २४,५५,९८,५४४/-
२) एम. ई. पी. सर्विसेस. ६,७८,२२,१४५/-
३) क्लोज सर्किट कॅमेरा सिस्टम ९३,६६,१४९/-
४) आधुनिक अग्निशामक व्यवस्था व धोकादर्शक व्यवस्था ८१,९८,३१३/-
५) उद्वाहन व्यवस्था ४ नं. लिफ्ट १,१०,७२,८००/-
६) इमारत व्यवस्थापकीय संरचना २७,२१,४७५/-
७) जनसंबोधन संरचना १०,५६,०९३/-
८) वातानुकूलित योजना ४,५७,५०,७६४/-
९) परिचारिका आवाहन यंत्रणा २५,६६,१३०/-
१०) माहिती संप्रेषण व्यवस्था ५६,०१,७३७/-
एकूण ३९,७७,३३,९७१/-
कामाची माहिती
कामाचे नाव जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडून नवीन इमारत बांधणे.
बांधकाम परवाना क्र.बी.पी./चिंचवड/१०२/२०१७ दि. २२/१२/२०१७
निविदा रक्कम र.रु.३९,७७,३३,९५१/-
कामाचा आदेश ०३ मार्च २०१८
कामाची मुदत ३० महिने ( दि. ०३ सप्टेंबर २०२० पर्यंत)
वास्तुविशारद व सल्लागार मे. शशी प्रभू ऍन्ड असोसिएट्स
ठेकेदाराचे नाव मे. एस. एस. साठे
बभूखंडाचे क्षेत्र ७,३७९.६२ चौ.मी. (७९,४२६.८९ चौ. फूट )
बांधकामास उपयुक्त क्षेत्र ६,१३३.६७ चौ.मी. (६६,०२२.२७ चौ. फूट )
कबांधकामाचे नियोजित क्षेत्र ५,४३२.६८ चौ.मी. (५८,४७६.८८ चौ. फूट ) (F.S.I. Purpose)
कप्रत्यक्ष बांधकामाचे क्षेत्रफळ तळमजला + ५ मजले = ९,१६३ चौ.मी (९८,६२९.७१ चौ. फूट )
जोत्याचे क्षेत्रफळ १,३२५ चौ.मी. (१४,२६२.१८ चौ. फूट )
पार्किंगचे क्षेत्र २,०९०.२२ चौ.मी. (२२,४९८.९४ चौ. फूट )
नियमानुसार – १८ चार चाकी, ६० दोन चाकी
प्रस्थावित – ६७ चार चाकी, ८५ दोन चाकी
नियोजित इमारतींमधील विविध विभागाची माहिती व बांधकामाचे क्षेत्रफळ
फ़्लॊअर क्र. विभागाची माहिती क्षेत्रफळ
पार्किंग फ़्लॊअर तळमजला चार चाकी २७ आत, ४० बाहेर , दुचाकी ४५ आत , ४० बाहेर व सायकल पार्किंग तसेच मेडिकल गॅस पुरवठा व्यवस्था आणि स्त्री कर्मचारी व पुरुष कर्मचार्यांच्या कपडे बदलण्याच्या खोल्या तसेच विद्युत खोली, शवागार ३२४.४४ चौ.मी.
३,४९२.२४ चौ.फूट
पहिला मजला बाह्यरुग्ण विभाग, १२ तपासणी कक्ष, ओ. पी. डी. केसपेपर व बिलींग डीपार्टमेंट, क्ष किरण तपासणी, प्रशस्त प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, फार्मसी (२४ तास), आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स , आपत्कालीन अतिदक्षता विभाग ७ खाटा ८४०.३४ चौ.मी.
९,०४५.३४ चौ.फूट
दुसरा मजला पॅथॉलॉजी लॅब, फिजिओथेरपी , उर्वरित बाह्य रुग्ण विभाग ६ खोल्या , क्ष किरण तपासणी व सिटी स्कॅन , ७ खाटा डे केअर वार्ड ९२३.४२ चौ.मी.
९,९३९.६१ चौ.फूट
तिसरा मजला अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स ४ थिएटर्स , अतिदक्षता विभाग १५ खाटा , डायलेसीस विभाग १० खाटा, रुग्णांच्या नातेवाईकांचा प्रतीक्षागृह, मध्यवर्ती किटाणूशोधन कक्ष (C.S.S.D.) १,३२४.४२ चौ.मी.
१४,२५५.९३ चौ.फूट
चौथा मजला पुरुष व स्त्रियांचा मेडीकल वार्ड { मेडीकल वार्ड ३६ खाटा } , सर्जीकल विभाग { सर्जीकल विभाग ३६ खाटा } १,०१४.०२ चौ.मी.
१०,९१४.८२ चौ.फूट
पाचवा मजला पॅथॉलॉजी लॅब, प्रशासन विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी कक्ष , कान, नाक घास व नेत्र वार्ड – १६ खाटा , अस्तिरोग विभाग २० खाटा, -सेमिनार हॉल- १०० आसनव्यवस्था १,००६.०५ चौ.मी.
१०,८२९.०३ चौ.फूट
एकूण १३९ खाटा व एकूण बांधकामचे क्षेत्र अंदाजे ५,४३२.६८ चौ.मी. (५८,४७६.८८ चौ. फू.)