Project Name: PROPOSED RECONSTRUCTION AND UPGRADATION OF OLD TALERA HOSPITAL.
Project Cost: INR 36+ Crores
नियोजित तालेरा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची पुनर्बांधणी.
सी.स. न.९६५ व १३९६ ,आरक्षण क्र.२२६,’ब’ प्रभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कामाचे स्वरूप
चिंचवड येथील सि.स.न.९६५ व १३९६ ,आरक्षण क्र.२२६,’ब’ प्रभागातील जुन्या तालेरा रुग्णालयाची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचे मनपा तर्फे नियोजन आहे. मनपा व स्थानिक परिसरामधील नागरिकांसाठी कमी दरात व चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यास सहाय्य्य होणार आहे. येथे १३९ खाटांचे सुसज्ज व मल्टि स्पेसिलीटी रुग्णालय बांधण्याचे नियोजन केले आहे त्यासाठी रक्कम रु. ३९.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे. सदर दवाखान्यामध्ये तातडीची सेवा, बाह्यरुग्ण विभाग, क्ष किरण तपासणी विभाग, अतिदक्षता विभाग, मेडिकल व सर्जिकल वॉर्ड ,कान, नाक, घसा व नेत्र विभाग, अस्थिरोग विभाग, चार ऑपरेशन थिएटर, चार लिफ्ट, दोन जिने यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पामुळे मनपाच्या, वाय.सी.एम.एच. व इतर रुग्णालयावरचा ताण कमी होणार आहे. सदर प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण असून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा व शहराच्या लौकिकात भर घालणारा आहे.
गोषवारा – अंदाजपत्रकीय खर्च
अ.क्र. | घटक | रक्कम .रु. मध्ये |
१) | स्थापत्य विषयक कामे + प्लंबिंग | २४,५५,९८,५४४/- |
२) | एम. ई. पी. सर्विसेस. | ६,७८,२२,१४५/- |
३) | क्लोज सर्किट कॅमेरा सिस्टम | ९३,६६,१४९/- |
४) | आधुनिक अग्निशामक व्यवस्था व धोकादर्शक व्यवस्था | ८१,९८,३१३/- |
५) | उद्वाहन व्यवस्था ४ नं. लिफ्ट | १,१०,७२,८००/- |
६) | इमारत व्यवस्थापकीय संरचना | २७,२१,४७५/- |
७) | जनसंबोधन संरचना | १०,५६,०९३/- |
८) | वातानुकूलित योजना | ४,५७,५०,७६४/- |
९) | परिचारिका आवाहन यंत्रणा | २५,६६,१३०/- |
१०) | माहिती संप्रेषण व्यवस्था | ५६,०१,७३७/- |
एकूण | ३९,७७,३३,९७१/- |
कामाची माहिती
कामाचे नाव | जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडून नवीन इमारत बांधणे. |
बांधकाम परवाना | क्र.बी.पी./चिंचवड/१०२/२०१७ दि. २२/१२/२०१७ |
निविदा रक्कम | र.रु.३९,७७,३३,९५१/- |
कामाचा आदेश | ०३ मार्च २०१८ |
कामाची मुदत | ३० महिने ( दि. ०३ सप्टेंबर २०२० पर्यंत) |
वास्तुविशारद व सल्लागार | मे. शशी प्रभू ऍन्ड असोसिएट्स |
ठेकेदाराचे नाव | मे. एस. एस. साठे |
बभूखंडाचे क्षेत्र | ७,३७९.६२ चौ.मी. (७९,४२६.८९ चौ. फूट ) |
बांधकामास उपयुक्त क्षेत्र | ६,१३३.६७ चौ.मी. (६६,०२२.२७ चौ. फूट ) |
कबांधकामाचे नियोजित क्षेत्र | ५,४३२.६८ चौ.मी. (५८,४७६.८८ चौ. फूट ) (F.S.I. Purpose) |
कप्रत्यक्ष बांधकामाचे क्षेत्रफळ | तळमजला + ५ मजले = ९,१६३ चौ.मी (९८,६२९.७१ चौ. फूट ) |
जोत्याचे क्षेत्रफळ | १,३२५ चौ.मी. (१४,२६२.१८ चौ. फूट ) |
पार्किंगचे क्षेत्र | २,०९०.२२ चौ.मी. (२२,४९८.९४ चौ. फूट ) नियमानुसार – १८ चार चाकी, ६० दोन चाकी प्रस्थावित – ६७ चार चाकी, ८५ दोन चाकी |
नियोजित इमारतींमधील विविध विभागाची माहिती व बांधकामाचे क्षेत्रफळ
फ़्लॊअर क्र. | विभागाची माहिती | क्षेत्रफळ |
पार्किंग फ़्लॊअर तळमजला | चार चाकी २७ आत, ४० बाहेर , दुचाकी ४५ आत , ४० बाहेर व सायकल पार्किंग तसेच मेडिकल गॅस पुरवठा व्यवस्था आणि स्त्री कर्मचारी व पुरुष कर्मचार्यांच्या कपडे बदलण्याच्या खोल्या तसेच विद्युत खोली, शवागार | ३२४.४४ चौ.मी. ३,४९२.२४ चौ.फूट |
पहिला मजला | बाह्यरुग्ण विभाग, १२ तपासणी कक्ष, ओ. पी. डी. केसपेपर व बिलींग डीपार्टमेंट, क्ष किरण तपासणी, प्रशस्त प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, फार्मसी (२४ तास), आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स , आपत्कालीन अतिदक्षता विभाग ७ खाटा | ८४०.३४ चौ.मी. ९,०४५.३४ चौ.फूट |
दुसरा मजला | पॅथॉलॉजी लॅब, फिजिओथेरपी , उर्वरित बाह्य रुग्ण विभाग ६ खोल्या , क्ष किरण तपासणी व सिटी स्कॅन , ७ खाटा डे केअर वार्ड | ९२३.४२ चौ.मी. ९,९३९.६१ चौ.फूट |
तिसरा मजला | अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स ४ थिएटर्स , अतिदक्षता विभाग १५ खाटा , डायलेसीस विभाग १० खाटा, रुग्णांच्या नातेवाईकांचा प्रतीक्षागृह, मध्यवर्ती किटाणूशोधन कक्ष (C.S.S.D.) | १,३२४.४२ चौ.मी. १४,२५५.९३ चौ.फूट |
चौथा मजला | पुरुष व स्त्रियांचा मेडीकल वार्ड { मेडीकल वार्ड ३६ खाटा } , सर्जीकल विभाग { सर्जीकल विभाग ३६ खाटा } | १,०१४.०२ चौ.मी. १०,९१४.८२ चौ.फूट |
पाचवा मजला | पॅथॉलॉजी लॅब, प्रशासन विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी कक्ष , कान, नाक घास व नेत्र वार्ड – १६ खाटा , अस्तिरोग विभाग २० खाटा, -सेमिनार हॉल- १०० आसनव्यवस्था | १,००६.०५ चौ.मी. १०,८२९.०३ चौ.फूट |